Manchar News : २५ फुटांवरून कोसळणाऱ्या चिमुकल्याचा मुलांनी घेतला झेल; मंचर येथील पोलीस अधिकारी शेटे कुटुंबावरचा मोठा अनर्थ टळला

'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय मंचर (ता. आंबेगाव) येथील शेटे कुटुंबाला आला.
man catch girl in hand falling on building image

man catch girl in hand falling on building image

sakal

Updated on

मंचर - 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय मंचर (ता. आंबेगाव) येथील शेटे कुटुंबाला आला. दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून सुमारे २५ फूट खाली कोसळणाऱ्या अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकल्या ‘लक्षित’चा परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी प्रसंगावधान राखत झेल घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मदतीला धावून आलेल्या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com