मुलांना दोन्ही पालकांच्या सहवास आवश्यकता

मुलांना दोन्ही पालकांच्या सहवास आवश्यकता
Published on

मुलांना पालकांच्या सहवासाची आवश्यकता
विभक्त पित्याला मुलाला भेटण्याची न्यायालयाची परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असले तरीही मुलांना दोन्ही पालकांच्या सहवासाची, प्रेमाची आवश्यकता असते, असे मत नोंदवून उच्च न्यायालयाने नुकतेच एका विभक्त पित्याला मुलाला भेटण्याची परवानगी दिली.
प्रतिवादी महिलेने कौटुंबिक न्यायालयात स्वतःच्याच दिलेल्या लेखी हमीचे पालन केलेले नाही, ही बाब व्यथित करणारी असल्याचे निरीक्षण न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने नोंदवले. त्या हमीनुसार, तिने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मुलाला त्याच्या वडिलांना भेटू देण्याचे मान्य केले होते. आई या प्रक्रियेला जेवढा अधिक विरोध करेल, तितकेच ते मूल वडिलांपासून दुरावेल; आणि नेमके हेच घडणे टाळायचे असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आणि विभक्त पित्याची याचिका स्वीकारून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पाच दिवसांसाठी मुलाचा ताबा त्याच्याकडे सोपवण्याचे आदेश विभक्त पत्नीला दिले.
मुलाला भविष्यातील जडणघडणीसाठी दोन्ही पालकांचे अस्तित्व महत्त्वाचे असते, असेही निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. त्याच वेळी विभक्त पतीला मुलाच्या भेटीचा अधिकार नाकारताना महिलेने मुलाबाबत दाखवलेल्या अतिसंवेदनशील भावनेवर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
काय प्रकरण?
प्रतिवादी विभक्त पत्नीने कौटुंबिक न्यायालयात उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात मुलाला भेटू देण्याचे मान्य केले होते; परंतु पुढे जाऊन तिने तसे करण्यास नकार दिला. तसेच, त्यांच्यात झालेल्या करारानुसार, आठवड्याच्या शेवटीही मुलाला भेटू देत नसल्याने पतीने अखेरीस उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com