esakal | पर्यावरणाची बालकांना आस्था (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Child

दरवर्षी बालदिन हा विविध प्रकारे साजरा केला जातो. गोष्टी सांगणे, विविध खेळ घेणे, खाऊचे वाटप अशा निरनिराळ्या गोष्टी बालदिनाच्या दिवशी केल्या जातात. 
- कल्पना मेमाणे, शिक्षिका

पर्यावरणाची बालकांना आस्था (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लहान मुलांची स्वप्नं काय असू शकतात? कोणाला चांदोबाशी खेळायचे असते, कोणाला यथेच्छ खाऊ खायचा असतो किंवा आई-बाबांकडून छान-छान कपडे हवे असतात. हे तर आहेच. पण देशाचे भविष्य असणाऱ्या या बालकांची स्वप्नं यापेक्षाही वेगळी आहेत. कोणाला पर्यावरणाची चिंता आहे. तर कोणाला शास्त्रज्ञ, डॉक्‍टर, इंजिनिअर, आर्टिस्ट होऊन भविष्यातील आपली स्वप्नं प्रत्यक्षात आणायची आहेत.

बालदिनाच्या पूर्वसंध्येला सहा ते बारा वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांशी ‘सकाळ’ ने संवाद साधला.  या वेळी पहिलीत शिकणारी आराध्या काळभोर म्हणाली, ‘‘मी मोठी होऊन झाडे लावणार आहे. तसेच पाणी वाचवणार आहे.’’ या मुलांमध्ये स्वच्छतेबद्दलही जागरूकता असल्याचे जाणवले. मला माझा देश स्वच्छ आणि सुंदर हवा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. स्वतः स्वच्छता पाळून, इतरांनाही ती पाळण्यासाठी विनंती करणार आहे, असे दुसरीत शिकणाऱ्या सिद्धी वाघोलेने सांगितले.  चौथीतील संस्कृती शेवाळे म्हणाली, ‘‘गुन्हेगारांवर वचक निर्माण करून, समाजात शांतता निर्माण करण्यासाठी मी पोलिस होणार आहे.’’