esakal | आपण माफ करायला शिकायला हवे - सिंधूताई सपकाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai-Sapkal

‘कुटुंबीयांनी घराबाहेर काढले नसते तर माझ्या हातून अनाथ मुलांचे संगोपन झाले नसते. त्यामुळे मला ज्या लोकांनी घराबाहेर काढले त्यांचे मी धन्यवाद मानते. आपण सर्वांनी माफ करायला शिकायला हवे,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.

आपण माफ करायला शिकायला हवे - सिंधूताई सपकाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘कुटुंबीयांनी घराबाहेर काढले नसते तर माझ्या हातून अनाथ मुलांचे संगोपन झाले नसते. त्यामुळे मला ज्या लोकांनी घराबाहेर काढले त्यांचे मी धन्यवाद मानते. आपण सर्वांनी माफ करायला शिकायला हवे,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील अशोका हॉलमध्ये बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंधूताई बोलत होत्या. 

या वेळी विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे, सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत आगस्ते आदी उपस्थित होते. 

सिंधूताई यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे महत्त्व या वेळी पटवून दिले. आतापर्यंत २८८ अनाथ मुलींचे आणि ४९ अनाथ मुलांचे लग्न ठरवले. त्याचबरोबर ३५० पेक्षा जास्त भाकड गाईंचे संगोपन करीत असल्याचे 
सिंधूताई म्हणाल्या. 

न्यायाधीश ए. व्ही. रोटे म्हणाल्या, ‘‘बेटी बचाव हे केवळ वाक्‍य नसून, ही एक चळवळ आहे. ही चळवळ आता ‘बेटी पढाव’मध्ये रूपांतरित झाली आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा उपक्रम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’