मराठी शाळेच्या अस्तित्वासाठी बालकुमार साहित्य संस्थेचे आंदोलन

प्रणिता मारणे
सोमवार, 17 जून 2019

- सर्व अमराठी शाळेत मराठी शिकविण्याबाबत शासनाने काढला अद्यादेश
- शासनाने मातृभाषा टिकविण्यासाठी या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करा
- अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालभारती कार्यालयासमोर आंदोलन
- बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांना दिले निवेदन 

पुणे : सर्व अमराठी शाळेत मराठी शिकविण्याबाबत शासनाने अद्यादेश काढला आहे. शासनाने मातृभाषा टिकविण्यासाठी या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. या मागणीसाठी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांना निवेदन देण्यात आले. 
या आंदोलनात ज्येष्ठ बाल साहित्यिकार राजीव तांबे, ल. म. कडू, डॉ. संगीत बर्वे, स्वाती राजे, डॉ. न.म. जोशी, आश्लेषा महाजन, ज्योतीराव कदम आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची सर्व जण पुढील आठवड्यात भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा प्रतिसाद पाहून पुढील दिशा ठरवणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childrens litrature organsation protesting fo the existence of Marathi school