

Former Foreign Secretary Vijay Gokhale and Nepali author Amishraj Mulmi participate in a discussion on China's influence in South Asia at Sakal Lit Fest
esakal
पुणे,: दक्षिण आशियाई देशांमध्ये चीनचा प्रभाव वाढत असून, भविष्यामध्येही तो वाढणार आहे. चीनबरोबरील संबंध पूर्णपणे थांबवू शकत नाही. या परिस्थितीमध्ये आपले हितसंबंध कायम राखत, चीनबरोबरील संबंध कशा पद्धतीने हाताळायचे, यावर विचार करावा लागेल, अशी भूमिका ‘इज चायना साऊथ एशियाज पार्टनर ऑर इट्स प्रॉब्लेम’ या परिसंवादामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मांडली.