चिंचोली जिल्हा परिषद शाळेत आनंदी बाजार उत्साहात
PGR26B03385
चिंचोली ः येथील आनंद बाजाराचे उद्घाटन करताना सरपंच अमर कसबे, उपसरपंच अजित शिंदे, ग्रामस्थ व शिक्षिका.
चिंचोली जि. प. शाळेत आनंद बाजार
पांगरी : चिंचोली (ता. बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने बालचमूसमवेत आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ, पालकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आनंदी बाजाराचे उद्घाटन सरपंच अमर कसबे, उपसरपंच अजित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, पालक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोलीच्या प्रांगणातच आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यवहाराचे ज्ञान, खरेदी-विक्रीची प्रक्रिया तसेच चालू घडामोडींची माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांना सोबत घेऊन खरेदी-विक्रीत मदत करत व्यवहाराचे धडे प्रत्यक्षात देताना दिसले. या आनंदी बाजारातून अंदाजे दहा हजार रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका पुष्पा चौधर,स्मिता नाझरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

