

चिंचवड, ता. २८ : गेल्या काही दिवसांपासून दळवीनगर, भोईरनगर आणि इंदिरानगर परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. चार-चार दिवस कचरा न उचलल्याने डास, उंदीर यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे डेंगी, हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यांवरच कचऱ्याचे ढीग पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. दररोज कचरा घेऊन जाणारी घंटागाडी नियमित वेळेवर येणे अपेक्षित असताना ती वेळेवर येत नाही. तसेच कचरा उचलण्यात सातत्य नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
महापालिकेकडून स्वच्छता अभियानाचे मोठमोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती गंभीर आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण होईपर्यंत प्रशासन जागे होणार नाही का ? असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रमुख मागण्या
- कचरा संकलनासाठी निश्चित वेळापत्रक हवे
- घंटागाडी सकाळ-संध्याकाळ नियमित पाठवावी
- वारंवार कचऱ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत
- ‘ग्रीन मार्शल’ची तात्पुरती नियुक्ती करावी
- सूचना फलक लावून दंडात्मक कारवाई करावी
नियमित व वेळेवर कचरा संकलन केले, तर ही परिस्थिती उद्भवणार नाही. परंतु तसे होताना दिसत नाही. ठेकेदारांमार्फत वाहन देखभाल व दुरुस्तीची कारणे दिली जातात. परिणामी, कचरा जास्त प्रमाणात साचतो.
- अनिल देवगावकर, स्थानिक नागरिक
दररोज नियमितपणे कचरा उचलला जाईल. यापुढे कचऱ्याचे ढीग साठणार नाहीत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. तशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या जातील.
- सुधीर वाघमारे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.