पदपथावर राडारोडा

पदपथावर राडारोडा
Published on

चिंचवड, ता.२८ : चिंचवडगाव ते काळेवाडी मुख्य रस्त्यावरील केशवनगर परिसरात दोन्ही बाजूंच्या पदपथांवर मोठ्या प्रमाणात राडारोडा, फरशा व बांधकाम साहित्य टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपासून पदपथांवरच फरशांचे गठ्ठे, वाळू, दगड, खडी पडून आहेत. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी मुलांना चालताना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. अनेक ठिकाणी पदपथ पूर्णपणे अडथळ्यांनी व्यापले गेले आहेत. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्गच उरलेला नाही. महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने याची दखल घेऊन पदपथांवरील राडारोडा हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com