

चिंचवड, ता.१९ ः चिंचवडमधील केशवनगर येथील वस्ताद बाळासाहेब गावडे महानगरपालिका जलतरण तलावावर अल्पवयीन मुलगा बुडून मृत्युमुखी पडल्याप्रकरणी महापालिका पातळीवर तसेच चिंचवड पोलिसांकडून स्वतंत्रपणे सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे तपास कामासाठी काही दिवस जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अबालवृद्ध मोठ्या संख्येने पोहण्यासाठी महापालिकेच्या तलावांवर गर्दी करत आहेत. अशा वेळी चिंचवडमधील गावडे जलतरण तलावावर कंत्राटी तत्वावरील चार जीवरक्षक हजर असतानाही श्रावण समीर गायकवाड (वय १७) याचा बुडून मृत्यू झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
संबंधित मुलगा सकाळी साडेसात वाजता आला. तेव्हा, त्याला आमच्या कर्मचाऱ्यांनी पोहता येते का ? असे विचारले असता तो गडबडला. त्यामुळे, त्याला परत पाठवले. पुन्हा तो ११ वाजता गेस्ट पास घेऊन आतमध्ये आला. तलावाच्या १४ फूट खोलीच्या ठिकाणी उडी मारली. तो बाहेर येत नसल्याचे आमच्या लक्षात आल्यावर त्याला जीवरक्षकाच्या सहाय्याने बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्याच्या डोळ्यामधून व नाकातून रक्त आल्याचे दिसले. आम्ही सीपीआर देऊन त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
- दिनेश राजपूत, कंत्राटदार पर्यवेक्षक
आम्ही पर्यवेक्षक, क्रीडा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली. संबंधित ठेकेदाराला आम्ही नोटीस दिली जाणार आहे. तसेच आमचे क्रीडा अधिकारी व पर्यवेक्षक घटनेच्या अनुषंगाने माहिती घेऊन आठवड्यांमध्ये अहवाल आयुक्तांना देणार आहोत.
- व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, अग्निशमन विभाग
सध्या आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. महापालिकेला यासंबंधीचा तपास व माहिती घेण्यासंबंधी पत्र पाठवले आहे. मुलाचे नातेवाईक सध्या रायगडला विधी करण्यासाठी गेल्यामुळे तक्रार नसल्याचे दिसून येत आहे. तरी देखील त्यांना पुन्हा बोलावून अधिक तपास करण्यात येईल.
- रणजीत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे), चिंचवड पोलिस ठाणे
CWD26A03282
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.