बारामतीत पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार?

बारामतीत पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार?

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथील पवारवस्ती परिसरातील वन परिक्षेत्रात भरदिवसा सकाळच्या वेळी चिंकारा हरणाची शिकार करण्यात आली. पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी काही जागरुक नागरिकांनी वेळीच लक्ष दिल्याने संबंधित आरोपींचा चिंकारा पार्टीचा बेत चुकला. मात्र, चिंकाराला आपला जीव गमवावा लागला.

या प्रकरणामुळे एकच खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वनविभागाने माहिती मिळताच कार्यवाही करीत गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्राणीप्रेमींमधून होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सोमवार (ता.08) रोजी जैनकवाडी येथील पवारवस्तीच्या परिसरात शेतकरी आपली कामे करीत असताना त्यांना एक जखमी चिंकारा जातीचे हरणाचा शिकारी कुत्रा पाठलाग करताना दिसले.त्यांनी यावेळी त्याच्या मागे एक व्यक्ति पळत होता. त्या हरणाला ठार मारुन कुत्रा बाजुला झाला. यावेळी संबंधित व्यक्तीला शेतकऱ्याने हटकले असता त्याने दमबाजी केली. यावेळी परिसरातील नागरिक जमा झाल्याने शिकाऱ्याने तेथून पळ काढला. या घटनेचे मोबाईल चित्रिकरणही करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नागरिकांच्या म्हणण्यानुसार आणखी चार ते पाच जण शिकारीसाठी जाळे लावून बसल्याचे पाहिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विशेष बाब महणजे हा प्रकार भरदिवसा सकाळी अकराच्या दरम्यान घडला. याबाबतची माहिती बारामती वनविभागाला मिळताच दुपारी बाराच्या दरम्यान त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार बारामतीत घडल्याने उपवनसंरक्षक लक्ष्मी, सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव, बारामतीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल टी. जे. जराड, वनरक्षक कवितके, वनमजूर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बारामतीमधील यापूर्वीचे चिंकारा प्रकरण खूप गाजले होते. यामुळे यावे संबंधितांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी प्राणी प्रेमींमधून होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बारामती तालुक्याच्या शिर्सुफळ, पारवडी, साबळेवाडी, गाडीखेल, जैनकवाडी उंडवडी, जराडवाडी, गोजूबावी या भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामुळे या भागात चिंकारा जातीची हरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. वन्य प्राण्याची शिकार करणे हा गुन्हा आहे. यामध्ये दंडासह शिक्षेची तरतूद आहे. यामुळे आरोपींचा पोलिसांच्या मदतीने शोध सुरु आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यईल.

- राहुल काळे (प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती)

पुण्यासह बारामती, फलटण, इंदापूर या भागातील लोक शिकारीसाठी येत असल्याचे बोलले जाते. त्यात स्थानिक नागरिक देखील कमी नाहीत. शिकारी कुत्र्यांच्या मदतीने ससे, घोरपड, हरीण यांची शिकार होत असते. तसाच काहीसा प्रकार येथे घडला असावा, अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. जीव धोक्यात घालून चिंकाराला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच चित्रिकरण करुन वाचा फोडणाऱ्या शेतकऱ्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com