पुण्याचा चिराग फलोर "जेईई'मध्ये देशात बारावा; दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

अत्यंत अवघड "जेईई मेन्स' प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी चिरागने अथक मेहनत घेतली. त्याच्या या संपूर्ण प्रवासादरम्यान मार्गदर्शन करणारे त्याचे पालक व शिक्षकांना या यशाचे श्रेय दिले पाहिजे.

पुणे - दिल्लीमधील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारा व पुण्याच असलेल्या चिराग फलोरने जेईई मेन्स परीक्षेमध्ये 300 पैकी 296 गुण घेऊन देशात 12वा रॅंक मिळवला तर दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम आला आहे. पुण्याला व इन्स्टिट्यूटला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. आकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेडचे (एईएसएल) संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश चौधरी यांनी चिरागचे अभिनंदन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चौधरी म्हणाले, ""चिरागने हे घवघवीत यश मिळविल्याने आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जेईई मेन्स ही जगातील सर्वांत अवघड परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जाते. जेईई मेन्स परीक्षा एनआयटी, आयआयआयटी व सीएफटीआयमधील प्रवेशासाठी पात्र आहे. अशा अत्यंत अवघड "जेईई मेन्स' प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी चिरागने अथक मेहनत घेतली. त्याच्या या संपूर्ण प्रवासादरम्यान मार्गदर्शन करणारे त्याचे पालक व शिक्षकांना या यशाचे श्रेय दिले पाहिजे. वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी परीक्षेची तयारी विशिष्ट पद्धतीने करून घेतो. त्यामुळे आकाश इन्स्टिट्यूटला हे यश मिळत आले आहेत. आमची संस्था याचसाठी प्रसिद्ध आहे. सहा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यामधून 12वा रॅंक मिळवणे ही चिरागने मोठी कामगिरी केली आहे. त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chirag Floor of Pune got 12th rank in the country in JEE Mains examination