पोलिस काढणार रेखाचित्रातून आरोपींचा माग; पाच दिवसांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

रेखाचित्र प्रशिक्षणाकरीता राज्यातून सुमारे 50 कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर सध्या सीआयडीतील 10 जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दहा जणांच्या या तुकडीला पाच दिवसांचा बेसिक अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रा. डॉ. गिरीश अनंत चरवड हे त्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या मदतीला रेखाचित्रकार राहणार आहे.
 

पुणे : गुन्ह्याच्या घटनास्थळावर आरोपींना पाहिलेल्या प्रत्यदर्शीनी दिलेल्या व पोलिसांकडे असलेल्या माहितीवरून त्यांचा माग काढण्यासाठी संशयितांचे रेखाचित्र काढणारे चित्रकार घडविण्याचे काम राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) हाती घेतले आहे. पोलिसांमधीलच रेखाचित्रकार घडविण्यासाठी पाच दिवसांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

VIDEO - पुण्यात हॉस्पिटलमध्ये बेडसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ

रेखाचित्र प्रशिक्षणाकरीता राज्यातून सुमारे 50 कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर सध्या सीआयडीतील 10 जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दहा जणांच्या या तुकडीला पाच दिवसांचा बेसिक अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रा. डॉ. गिरीश अनंत चरवड हे त्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या मदतीला रेखाचित्रकार राहणार आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागात भारतातील पहिला रेखाचित्र विभागाचे उद्‌घाटन राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी सीआयडीचे प्रमुख अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अतुलचंद कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण साळुंके, फत्तेसिंग पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर उपस्थित होते. यावेळी जयस्वाल म्हणाले, ''राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेत किमान पाच प्रशिक्षित कर्मचारी नेमणुकीस असतील, अशा पद्धतीने रेखाचित्र काढण्याचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्याचे अधिकारी, कर्मचारी यांना दिले जावे. त्याकरीता सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण रेखाचित्र विभाग तयार करण्यात येईल. तपासासाठी रेखाचित्रकार तयार व्हावेत, हाच अभ्यासक्रम सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.''

रेखाचित्रांचा असा होणार फायदा :
काही गुन्ह्यांमधील आरोपी हे 15 ते 20 वर्षांपासून फरार असतात. ते सध्या कसा दिसत असतील याचा अंदाज बांधून त्यांच्या विविध रुपांची रेखाचित्रे काढून त्याला शोधता येवू शकते. तसेच बेवारस मयताची किंवा डिकंपोझ झालेल्या मानवी शरीराची ओळख पटविणे, सीसीटीव्ही फुटेजमधील अस्पष्ट दिसणारी व्यक्‍ती, व्हिडिओ एडिटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याची स्पष्टता विकसित करणे व त्यावरून त्या व्यक्‍तीचे रेखाचित्र काढणे. गरज वाटल्यास त्याचे शिल्प तयार करणे असे तपास कामात सहाय्य करणारे रेखाचित्रकार तयार करण्यात येणार आहेत. या सर्वांचा गुन्ह्यांचा मागोवा घेण्यास मोठा फायदा होणार आहे.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CID is Starting the five day criminal Sketch course for Police to trace the accused