पुणे - हडपसर आणि फुगेवाडीत विषारी दारूमुळे झालेल्या जीवित हानीची पोलिस महासंचालकांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. .विषारी दारूमुळे फुगेवाडीतील घटनेत १२, तर हडपसर परिसरात सहा अशा एकूण १८ नागरिकांचा बळी गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीआयडीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पोलिसांकडून या गुन्ह्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे, पंचनामे आणि आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सीआयडीकडून अधिकृतपणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..सीआयडीचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. ही विषारी दारू कोठून आली, तिची निर्मिती कुठे झाली याचा छडा लावला जाणार आहे. सीआयडीच्या तपासामुळे या अवैध धंद्यातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.यापूर्वी अहिल्यानगरमधील २०१७ च्या पांगरमल विषारी दारूकांडात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर काहींना अंधत्व आले होते. सीआयडीचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी या संघटित टोळीविरुद्ध सीआयडीच्या इतिहासातील पहिल्यांदाच ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली होती..विषारी दारू प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन पोलिस महासंचालकांनी हा तपास ‘सीआयडी’कडे सोपवला आहे. स्थानिक पोलिसांकडून गुन्ह्याची कागदपत्रे हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. न्यायवैद्यक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास केला जाईल. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांसह आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळवून देण्यात येईल.- सुनील रामानंद, अतिरिक्त पोलिस महासंचालक, सीआयडी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.