

ICSE Board Result
पुणे - द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सतर्फे (सीआयएससीई) घेतलेल्या आयसीएसई (दहावी) परीक्षेत ९९.१८ टक्के आणि आयएससी (बारावी) परीक्षेत ९९.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आयसीएसईच्या निकालात ०.०९ टक्क्यांची, तर आयएससीच्या निकालात ०.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.