
आंबेठाण : चाकण एमआयडीसी मधील कंपन्यामध्ये निघणारा कचरा हा भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला आसखेड खुर्द (ता.खेड ) गावाच्या बाजूकडे टाकला जात आहे. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी गाडीतील कचरा खाली करताना संबंधित गाडी चालकाला रंगेहाथ पकडले. औद्योगिक भागातील कचरा आमच्या भागात कशाला ? असा सवाल करीत पुढील काळात जर कोणी असा कचरा टाकताना सापडले तर त्याला योग्य धडा शिकवला जाईल, असा इशारा आसखेड खुर्द आणि करंजविहिरे गावातील नागरिकांनी दिला आहे.