घराबाहेर पडू नका, या ऍपवर करा खरेदी 

विजय जाधव
Tuesday, 5 May 2020

नागरिकांनी खरेदीसाठी घराबाहेर न पडता ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा.

भोर (पुणे) : संचारबंदीच्या काळात भोरमधील नागरिकांना ऑनलाइन खरेदी करता यावी, यासाठी नगरपालिका प्रशासनाने "नगरसेतू' (NagarSetu) ऍप विकसित केले आहे. या ऍपद्वारे नागरिकांना किराणा माल, भाजीपाला, फळे, औषधे व मिनरल वॉटर आदींची खरेदी करता येईल. नागरिकांनी खरेदीसाठी घराबाहेर न पडता ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. 

या नागरिकांना लागलीये घराची आस, पण प्रशासन देईना साथ... 

याबाबत मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी माहिती दिली की, ऍपच्या माध्यमातून ऑर्डर दिल्यावर एका तासात औषधे, तर किराणा माल आठ तासांच्या आत घरपोच येईल. त्यासाठी 76 स्वयंसेवकांची नेमणूक केली असून त्यांना ओळखपत्रे दिली आहेत. शहरातील किराणा मालाची 55, औषधांची 40 दुकाने या ऍपला जोडण्यात आली आहेत. ऑर्डर दिल्यावर संबंधित विभागातील स्वयंसेवक व दुकानदार यांना ती समजेल. ते ग्राहकाला फोन करून माल केव्हा मिळेल, याची कल्पना देतील. ग्राहकांनी संबंधित दुकानदारास बिलाचे पैसे ऑनलाइन किंवा रोखीने देण्याची सोय करण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगरसेतू ऍप वापरण्याची पद्धत 
- सर्वप्रथम https://drive.google.com/file/d/1KnGB29yLo98Ey8f9W3xdzRDRss5EHrEO/view?u... या लिंकवर क्‍लिक करून हे ऍप डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर इन्स्टॉल करावे. 
- इन्स्टॉल करताना मोबाईल क्रमांक व माहिती भरावी. 
- वस्तूंच्या विभागणीनुसार आयकॉनवर क्‍लिक करून आपल्या भागातील दुकानदार निवडावा. 
- संबंधित दुकानदारांच्या Whats App वर तुमची ऑर्डर द्यावी. 
- ऑर्डर तयार झाल्यावर संबंधित दुकानदार किंवा स्वयंसेवक फोन करून बिलाची माहिती देऊन माल घरपोच देतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Bhor, don't go out for shopping, do shopping on this app