पुणेे : नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे

जितेंद्र मैड
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : नळस्टॉप जवळील भालेकर चाळीतील महिला गेली तीन महिने पाणी टंचाईला तोंड देत आहेत. कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांनी नळ खाली घेतले, अधिकऱ्यांच्या सल्ल्याने नळाला मोटारी लावल्या तरीसुध्दा पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला आहे.

पुणे : नळस्टॉप जवळील भालेकर चाळीतील महिला गेली तीन महिने पाणी टंचाईला तोंड देत आहेत. कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांनी नळ खाली घेतले, अधिकऱ्यांच्या सल्ल्याने नळाला मोटारी लावल्या तरीसुध्दा पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला आहे.

निधी बोनापुर्ती म्हणाल्या की, ''गेले वर्षभर मी दुसऱ्याच्या नळावर पाणी भरत आहे. निर्मला भरम म्हणाल्या, नगरसेवकाला तक्रार केली तेव्हा त्याने टँकर पाठवला. पण रात्री दहानंतर टँकर येत असेल तर, आम्ही महिलांनी करायचे काय. येथे रस्त्याचे काम बरेच दिवस चालू आहे. त्यामुळे झालेल्या खोदाईने टँकरचे पाणी आणायचाही त्रास होतो.टट

पाणी नसल्यामुळे आजारी पडलेल्या आशा माझीरे या लेकीकडे राहायला गेल्या. महिलांनी सांगितले की, ''नगरसेविकेकडे तक्रार केली तर त्या म्हणाल्या की, मी झोपडपट्टीसाठी काम करणार नाही. जर आमचे काम होत नसेल तर आम्ही मतदान का करायचे. मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आम्ही आहोत.''

गौरी दिघे, कमल जाधव, जनाबाई अनिवसे, प्रियंका जोरी, सुनिता खिलारे, आशा यादव, जनाबाई बानगुडे, नाना हेमगुढे, चैत्राली पवळे, कमल सावंत, सायली ओवले, प्रियंका पवार यांनी सांगितले की, पाणी नसल्यामुळे आमच्याचाळीत आजाराचे प्रमाण वाढले आहे. नगरसेवकांना सांगूनही प्रश्न सुटलेला नाही.

पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संतोष लांजेकर यांनी सांगितले की, ''या भागात पाणीपुरवठ्यात कशामुळे अडचण येत आहे याचा गेले चार दिवस आम्ही शोध घेत आहोत. लवकरच यावर मार्ग निघेल अशी आशा आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चार वाहीन्या आहेत. कुठे अडथळा आला आहे याचा शोध सुरु आहे.''

''वर्ष झाले आम्ही पाणी टंचाईचा सामना करत आहोत. टँकरने सर्वांना पाणी घेता येत नाही. कामाला जाणारांच्या सोयीने टँकर येत नाही. सगळ्या धुण्याभांड्याच्या कामाला जातात. ज्येष्ठ नागरिकांना लांबून पाणी आणावे लागते'' असे कमल सावंत यांनी सांगितले 

येथे तपासणी केली असता एका हाॅटेल चालकाने मोटर लावून पाणी उपसा करत असल्याचे आढळले आहे.  महापालिका अधिकारी अशा किती व्यावसायिकांवर कारवाई करणार याबद्दल नागरिकांना उत्सुकता आहे. 

Web Title: Citizens facing problem due to Water issue in pune