लॉकडॉऊनमध्ये कष्टकऱ्यांचे हाल संपेनात; तळपत्या उन्हात धान्यासाठी रांगेत

citizens have stand in queue for grains In the summer during lockdown
citizens have stand in queue for grains In the summer during lockdown

पुणे : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला, पैसा संपत आला. रेशन दुकानात धान्य आल्याचा निरोप मिळताच कष्टकऱ्यांनी मोठी गर्दी केली. डोक्‍यावर सुर्य तापलेला असतानाही तीन तास रांगेत थांबून धान्य घेऊन, पुढच्या काही दिवसांची सोय करून ठेवली. हे चित्र आहे सिंहगड रस्त्यावरील पानमळा येथील.
 

"कोरोना' लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत, कारखाने, बांधकाम साईट, शोरूम, दुकाने सर्व बंद आहेत. त्यामुळे रोजंदारीवर कामासाठी जाणाऱ्या कष्टकऱ्यांचे हाल सुरू आहेत. या काळात धान्य कमी पडू नये म्हणून सरकारने पुढील तीन महिन्यांचे धान्य गरीबांना दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून रेशन दुकानांकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पानपळा येथील नितीन राऊत यांच्या दुकानात गहु आणि तांदूळ आल्याची माहिती कार्डधारकांना मिळाली. सकाळी 10 ला दुकान सुरू होणार असले तरी आठ वाजल्यापासून दुकानाबाहेर सुमारे 100 लोकांची रांग लागली. दुपारी दोन वाजून गेले तरी भर उन्हामध्ये डोक्‍यावर पोते, पिशवी घेऊन रांगेत जवळपास 40 ते 50 महिला, पुरूष उभे होते. काही जणांनी त्यांनी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती. उन वाढल्याने रांगेत थांबलेल्या वृद्धांना लोक स्वताःहून पुढे जाऊन धान्य घेण्यास सांगत असल्याने यावेळी मानुसकीचे दर्शनही घडले.

रेशन दुकानदार राऊत म्हणाले, "माझ्याकडे 1 हजार 100 ग्राहक आहेत. कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी एप्रिल महिन्यातील दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू आले आहेत. लॉकडाऊनमुळे धान्य मिळणार की नाही या धास्तीने आज पहिल्याच दिवशी लोकांनी गर्दी केली आहे. सकाळपासून दुपारी एक पर्यंत सुमारे 300 जण धान्य घेऊन गेले आहेत. अद्याप मे व जून महिन्याचे धान्य आलेले नाही.


"सकाळी 10 वाजता रांगते थांबल्यावर एक वाजता माझा नंबर लागला. घरात सहा लोक आहोत. माझ आणि पोरांच काम बंद झाल आहे. कुठे काम मिळेल का शोधायचा प्रयत्न करतो, पण मिळत नाही. आता एका महिन्याचे गुहू, तांदूळ मिळाले तेवढेच बरे झाले. साखर, तेल अशा वस्तूही सरकारकडून रेशनमध्ये मिळाल्यातर बरे होईल.''
- नवनाथ कांबळे, दांडेकर पुल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com