esakal | कोकणात जाणाऱ्या नागरीकांना करावा लागतोय खड्डे व वाहतूक कोंडीचा सामना
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कोकणात जाणाऱ्या नागरीकांना करावा लागतोय खड्डे व वाहतूक कोंडीचा सामना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड-शिवापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गणेशोत्सवासाठी निघालेल्या नागरीकांना पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करत प्रवास करावा लागला. टोल भरूनही खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते. तर या रस्त्यावर खड्डेच नसल्याचा अजब दावा रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी करत आहेत.

गणेशोत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण आदी ठिकाणी जाणाऱ्या नागरीकांची गुरुवारी सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुरुवारी गणेशोत्सवासाठी निघालेल्या प्रवाशांना पुणे-सातारा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागला. टोल भरूनही पुढे रस्त्यावर खड्डे आणि वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते.

खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल भरून पुढे गेले की शिवरे आणि वरवे या भागातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरक्ष चाळण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वेळ लागत होता. खड्डे आणि वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत होते.

"पुणे-सातारा रस्त्यावर टोल नाक्याच्या पुढे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच पाऊस असल्याने खड्ड्यात पाणी साचले होते. त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी सुमारे पंधरा मिनिटे वेळ लागला. टोल भरूनही पुणे-सातारा रस्त्यावर मनस्ताप सहन करावा लागला," अशी प्रतिक्रिया प्रवासी योगेश मोने यांनी व्यक्त केली.

एकीकडे खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली असताना दुसरीकडे "रस्त्यावर खड्डेच नसून सर्व खड्डे बुजविण्यात आले आहेत," असा अजब दावा रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी राकेश कोळी यांनी केला आहे.

loading image
go to top