कोरोनामुळे नागरिकांचा योगाकडे कल

कोरोनामुळे नागरिकांचा योगाकडे कल

पुणे ः शहरातील विविध शाळा, संस्था व सोसायट्यांमध्ये योगा करून जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. कोरोनामुळे योगाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला असून योगाकडे कल वाढल्याचे यातून दिसून आले. कोरोनामुळे अनेक कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडले. योग दिनानिमित्त सामाजिक संस्था, राजकीय संघटना, शाळा व महाविद्यालयांच्या वतीने स्पर्धा, कार्यशाळा, योग शिबिरे, ऑनलाइन सत्रे आदी उपक्रमांचे आयोजन केले होते.

कोरोनामुळे नागरिकांचा योगाकडे कल
पुणे : प्रयोगशील नववैज्ञानिकांचा सन्मान

महाएनजीओ फेडरेशनतर्फे शिबिरे- महाएनजीओ फेडरेशनने राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी १०० ठिकाणी योग शिबिरे उत्साहात पार पडली. शिबिरांमध्ये २५ ते ५० लोकांच्या सहभागाने योगासने, ध्यान, प्राणायाम व देशभक्तिपर गीतांचे श्रवण करण्यात आले. योग शिबिरे रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. उपक्रमाचे आयोजन फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मुख्य कार्यवाह विजय वरुडकर, उपक्रम प्रमुख गणेश बाकले आदींनी केले.

योगा चॅलेंज- संत प्रीताजी यांनी ‘एकम योगा चॅलेंज’चे आयोजन केले होते. यामध्ये हठयोग, कर्मयोग, राजयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाबाबत माहिती देण्यात आली.

सत्रीय संस्कृतीतील योगासने- आर्ट ऑफ डान्सिंगच्या विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त आसामच्या सत्रीय परंपरेतील ५०० वर्षे जुनी माती आखाड्यातील योगासने सादर केली. सत्रीय संस्कृती महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी काम करणाऱ्या सत्रीय नर्तिका डॉ. देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही आसने केली.

कोरोनामुळे नागरिकांचा योगाकडे कल
पुणे : गुंतवणुकदारांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली, पण...

योग मुद्रांचे प्रात्यक्षिके-टिळक रस्ता येथील डीईएस प्री-प्रायमरी शाळेने योग व संगीत दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा केला. यामध्ये शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याचे मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी सांगितले. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलतर्फे (जीआयआयएस) योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. यामध्ये एक हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सूर्यनमस्कार, ताडासन, अर्ध चक्रासन यांसारख्या विविध योग मुद्रांचे प्रात्यक्षिके सादर केली. जीआयआयएसच्या ऑपरेशन्स विभागाचे संचालक राजीव बन्सल यांनी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व नगरसेवक राजेश येनपुरे व पतंजली योग समितीच्या वतीने नारायण पेठ येथे सामुहिक योग साधना उपक्रम पार पडला. या वेळी खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार मुक्ता टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे आदी उपस्थित होते.

सूर्य नमस्कार प्रशिक्षण-श्री देशमुख महाराज फाउंडेशन, नक्षत्र नऊवारी वस्रदालन, योगोत्कर्ष संस्थेने योग, प्राणायाम व सूर्य नमस्कार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर मनपा कर्मचारी व कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले. स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात खासदार गिरीश बापट, महापालिकेचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, योगगुरू सुनील रोटी आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे नागरिकांचा योगाकडे कल
पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळ्याजवळ अपघात; वाहतुकीची प्रचंड कोंडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com