Shrinath Bhimale
sakal
पुणे - शहरात कोणत्याही चौकात, रस्त्यावर लाकडी पहाड उभारून अनधिकृत फ्लेक्सबाजी केली जाते. आता अशी जाहिरातबाजी करणाऱ्या ‘माननियांना’ महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. ‘भाऊ फ्लेक्स काढा’ या संकेतस्थळावरून सर्वाधिक तक्रारी दाखल झालेल्या नगरसेवकांना महापालिकेने उपरोधिकपणे यांतर्गत ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ जाहीर केले आहेत. यात स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना प्रथम, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांना द्वितीय तर सुनील पांडे यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. महापालिकेच्या या पुरस्कारांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.