शहर होण्यासाठीची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील गहुंजे गावाचा प्रवास ‘गाव ते शहर’ असा सुरू झाला आहे. एकीकडे विस्तारलेले शेती क्षेत्र आणि गावाचा ग्रामीण चेहरा दिसतो, तर दुसरीकडे उंच इमारती गावाच्या शहरीकरणाकडे होत असलेल्या वाटचालीकडे लक्ष वेधतात. गहुंजे स्टेडियममुळे गावाची आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली ओळख, निर्मलग्राम आणि तंटामुक्त गाव पुरस्कार, आयएसओ मानांकन असलेली ग्रामपंचायत या ठळक बाबी गावाचे वेगळेपण नजरेस आणतात. आता ग्रामस्थांना विकासाचे वारे हवे आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होण्यास ग्रामस्थ अनुकूल आहेत.

दृष्टिक्षेपात गहुंजे 
 भौगोलिक क्षेत्रफळ : ५०५.३२ हेक्‍टर
 लागवडीखालील क्षेत्र (बागायती व जिरायती) : ३५२.३७ हेक्‍टर
 लागवडीखाली नसलेले क्षेत्र : २३.३३ हेक्‍टर
 वन क्षेत्र : १२९.८८ हेक्‍टर
 लोकसंख्या : ४०४६ (२०११ च्या जनगणनेनुसार)
 एकूण मतदार : १९२९
 वार्षिक उत्पन्न (२०१७-१८) : २२ लाख ५५ हजार (घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य आणि वीजकर)
 मुख्य व्यवसाय : शेती आणि दूध डेअरी
 प्रमुख पीक : ऊस, गहू, तांदूळ आणि फूलशेती
 सोयी-सुविधा : ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषदेच्या २ प्राथमिक शाळा, वाड्या-वस्त्यांवर सौर दिवे, चौकाचौकांत पथदिवे, देहूरोड-गहुंजे बससेवा.
 सुविधांची गरज : माध्यमिक शाळा, चांगले रस्ते, गावठाणापर्यंत बस सुविधा, सरकारी रुग्णालय, सांडपाणीवाहिन्या.

गावामध्ये सध्या सर्व सोईसुविधा आहेत. महापालिकेत गाव समाविष्ट करावे की नाही, याबाबत ग्रामसभा घेऊन निर्णय घेतला जाईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- शीतल बोडके, सरपंच

पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश झाल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढेल. शेती क्षेत्रावर आरक्षणे पडतील. 
तर दुसरीकडे विविध सुधारणा होतील. सध्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा येतात. महापालिकेत गाव गेल्यानंतर विविध सुविधा मिळतील. 
- पूनम बोडके, उपसरपंच

महापालिकेत समावेश झाल्यास स्वच्छ पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, आरोग्यविषयक सुधारणा, रुग्णालय, गावठाणापर्यंत बस आदी सुविधा मिळतील. सांडपाणी वाहिन्यांची सोय होईल. त्यामुळे गाव महापालिकेत समाविष्ट व्हायला हवे. 
- माउली बोडके, ग्रामस्थ

Web Title: city gahunje village development