पीएमआरडीए मेट्रोच्या कामाला शहर सुधारणा समितीची मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महापालिकेच्या हद्दीत सुरू करण्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) शुक्रवारी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या हद्दीत या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महापालिकेच्या हद्दीत सुरू करण्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) शुक्रवारी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या हद्दीत या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान 23 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी बाणेर ते शिवाजीनगरदरम्यान 11 किलोमीटरचा मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो. या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी समितीच्या बैठकीत ठेवला होता. या वेळी या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या "टीओडी झोन'मधील बांधकामांना परवानगी देताना त्यातून मिळणारे बांधकाम विकसन शुल्क महापालिकेला मिळावे, अशी उपसूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या सदस्यांनी मांडली. मात्र ती सूचना बहुमताने फेटाळण्यास आली आणि मूळ प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी ही माहिती दिली. 

पीएमआरडीएच्या मेट्रोला यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर निविदा काढून या प्रकल्पाचे काम टाटा सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. जानेवारीत या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. त्यापूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली होती, असे सूत्रांनी सांगितले. 

खासगी जागाही ताब्यात घेणार 
महापालिकेच्या हद्दीत अकरा मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी काही खासगी जागादेखील ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून, ती अद्याप करण्यात आलेली नाही. ती प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: City Improvement Committee approval for PMRDA Metro work