
अतिसूक्ष्म धूलिका, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी
पुणे - लॉकडाउनच्या कालावधीत पुणे शहर आणि परिसरात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्यावतीने नुकतीच याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सूक्ष्म धूलिका (पीएम २.५) आणि नायट्रोजन ऑक्साईड या प्रदूषणातील घटकांमध्ये सुमारे ३५ टक्के आणि ७० टक्के इतकी घट झाल्याचे दिसून आले.
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गाड्यांचे प्रमाण ९५ टक्के कमी झाले होते.
तसेच कारखाने व औद्योगिक कारभार बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहर आणि परिसरातील प्रदूषणाचे प्रमाण ५० ते ६० टक्के कमी झाले. यामध्ये अतिसूक्ष्म धूलिका आणि नायट्रोजन ऑक्सईड या प्रदूषणातील घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तसेच शहर आणि परिसरातील हवामानाची गुणवत्ता ही चांगली आणि समाधानकारक होती. केवळ वायू प्रदूषणच नाही तर लॉकडाउनमुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा कमी झाले. त्यामुळे शहरात पक्ष्यांचा व कीटकांचा वावर वाढला.
अतिसूक्ष्म धूलिका व नायट्रोजन ऑक्सईड आरोग्यावर अतिशय घातक परिणाम करतात. नायट्रोजन ऑक्सईड हा हवामान बदलासाठीसुद्धा कारणीभूत ठरतो. सध्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने लॉकडाउनच्या कालावधीत आणखी वाढ करण्यात आली आहे. परंतु संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या भागांना वगळता सध्या इतर भागांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढत असल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून दिसत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर वाहनांची संख्या लॉकडाउनच्या तुलनेत सध्या जास्त असल्याने शहरातील काही भागांमध्ये हवामानाची गुणवत्ता आता पुन्हा मध्यम स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर प्रदूषणाचे प्रमाण पुन्हा वाढेल का अशी चिंता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाउनमुळे वायूप्रदूषणात नक्कीच घट झाली आहे. नदी व जलस्रोतांमधल्या प्रदूषणावर किती परिणाम झाला आहे, यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे नद्यांमधल्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. जलप्रदूषणा संदर्भातील माहिती व आकडेवारी नमुन्यांची चाचणी झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील.
- मंगेश दिघे, पर्यावरण विभाग प्रमुख, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.