Pune News : शहरात सुरु होणार पाच आठवडे बाजार

शासनाच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान राबविले जात आहे.
weekly vegetable bazar
weekly vegetable bazarsakal
Updated on

पुणे - पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पुणे महापालिका लोहगाव, बाणेर, पाषाण, बावधन व बालेवाडी या ठिकाणी ॲमेनिटी स्पेसच्या जागा शेतकरी आठवडे बाजारासाठी उपलब्ध करून देणार आहे.

शासनाच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत जागतिक बँकेच्या मदतीतून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत हे आठवडे बाजार उभारले जाणार आहेत.

शेतकरी आठवडे बाजाराच्या दर्जा मध्ये सुधारणा करून, शहरी भागातील ग्राहकांना विषमुक्त आणि ताजी फळे व भाजीपाला वाजवी दारात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा, तसेच वाहतूक कोंडी कमी व्हावी हा उद्देशही आहे. शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) निवड केलेल्या संस्थाना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना या बाजारात विक्रीसाठी संधी देण्यात येणार आहे.

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, शहरी भागातील नागरिकांना स्वच्छ, ताजे फळे, भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी हे बाजार भरवले जाणार आहेत. शहरी भागातील नागरिकांचा अन्न पोषणाचा स्तर वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com