पुणे - महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठा फौजफाटा घेऊन खराडीत एक मोठी अतिक्रमण कारवाई करून तब्बल १ लाख ८५ चौरस फुटावर बुलडोझर चढवला होता. मात्र, आता या कारवाईवरून संशयाचे ढग निर्माण झाले आहेत..एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लावली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांनी चौकशी करून कारवाई करू असे स्पष्टीकरण दिले आहे..शहरात रस्ते, पादचारी मार्ग इमारतींचे फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन येथे प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर जुजबी कारवाई केली जाते. पण गेल्या आठवड्यात अतिक्रमण विभागाने पहाटे पाच वाजल्यापासून खराडीतील एका मोठ्या भूखंडावर कारवाई केली. १ लाख ८५ हजार चौरस फूटावरील कच्चे-पक्के शेड, बांधकाम पाडून टाकले. एवढी मोठी कारवाई केल्याने कौतुक होत असताना आता त्याबाबत प्रशासनात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे..हा खासगी भूखंड एका बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतला. पण तेथील अतिक्रमणे निघत नसल्याने महापालिकेशी संपर्क केला. वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हालल्यानंतर महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या दिवशी सकाळी सकाळी ही कारवाई करण्यात आली..‘खराडीत भारत माता नावाने अनधिकृत मार्केट सुरू असल्याची तक्रार आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पण खासगी व्यक्तीची जागा रिकामी करून देण्यासाठी ही कारवाई असेल तर त्याची माहिती घेऊन कारवाई केली जाईल.- नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.