पुणे - पुणे महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने त्यांच्या निवडीची आज अनौपचारिकता पार पडली. पीठासीन अधिकारी, समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ- मुंडे यांनी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. .महापालिकेच्या कामकाजात एकूण सात समित्या आहेत. त्यापैकी स्थायी समिती सर्वात महत्त्वाची आहे, तर उर्वरित सहा विषय समित्यांना आर्थिकविषयक अधिकार नसले तरी धोरणात्मक निर्णय घेतला जातो. त्यामुळे शहरासाठी या समिती महत्त्वाच्या आहेत. या समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी २३ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल झाले होते. या वेळी केवळ भाजपतर्फेच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली..समिती आणि नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षविधी समिती - अध्यक्ष - स्वरदा बापट, उपाध्यक्ष - पायल तुपेशहर सुधारणा समिती अध्यक्ष - स्मिता वस्ते, उपाध्यक्ष - सपना छाजेडमहिला व बाल कल्याण समिती - अल्पना वरपे, उपाध्यक्ष - तन्वी दिवेकरक्रीडा समिती - अध्यक्ष - नारायण गलांडे, उपाध्यक्ष - दिनेश माथवडशिक्षण समिती - अरुण राजवाडे, उपाध्यक्ष अतुल तरवडेनाव समिती - अध्यक्ष - पल्लवी जावळे, उपाध्यक्ष - सुनील पांडे.निवडणुकीपूर्वीच गाडीची मागणीमहापालिकेत पदाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर गाडी, स्वतंत्र कार्यालय यासह अन्य सुविधा दिल्या जातात. यात महापौर, गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सहा विषय समित्यांचे अध्यक्ष, १५ प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यासाठी ही सेवा आहे. यासाठी मोटर वाहन विभागाने धोरण तयार केलेले आहे. त्यात शिक्षण समिती उपाध्यक्षांना गाडी देण्याचे नमूद केले आहे. भाजपने शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी नगरसेवक अतुल तरवडे यांना संधी दिली आहे. त्यांची आज अधिकृत निवड झाली आहे..पण तरवडे यांनी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच नगरसचिव विभागात जाऊन ‘मी उपाध्यक्ष आहे, मला महापालिकेची गाडी हवी आहे.’’ असे सांगत महापालिकेच्या गाडीची मागणी केली. पण नगरसचिव विभागाने याबबताचा निर्णय मोटर वाहन विभागाकडून घेतला जातो असे सांगितले. त्यावरून तरवडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आज विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर शिक्षण समिती उपाध्यक्ष तरवडे यांना मोटर वाहन विभागाने महापालिकेचे वाहन उपलब्ध करून दिले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.