water pipeline leakage
sakal
पुणे - महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात सुमारे एक हजार किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकताना निष्काळजीपणे काम केले. त्यामुळे दोन जलवाहिन्या व्यवस्थित न जोडल्या गेल्याने (गॅप-कोल्जिंग) पाणी गळतीचे प्रमाण वाढत आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी होत असताना महापालिकेला मोठा भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
समान पाणीपुरवठा योजनेचे काम २०१७ मध्ये हाती घेण्यात आले. यासाठी पाच भागांत विभागणी करून प्रत्येक कामाची निविदा काढली आहे. ही योजना पाच वर्षांत पूर्ण होणार होती. आता एप्रिल २०२६ संपणार असताना सुमारे २० टक्के काम शिल्लक आहे.