

पुणे - शहरातील नागरी समस्यांकडे केवळ कागदावरून पाहण्याऐवजी आता अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे लागणार आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळच्या सत्रात शहरातील भागांची पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबत आदेश काढले आहेत.