Video : शिरुरमध्ये आजी-माजी आमदारांत माईक फाईट

सागर आव्हाड
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. आमदार बाबुराव पाचर्णे हे बसलेल्या सभासदांना माकड म्हटले. त्यावरून शाब्दिक चकमक झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि तालुक्याचे आजी माजी आमदार यामध्ये मोठ्या प्रमाणावर शाब्दिक युद्ध रंगले.

पुणे : माजी आमदार व सध्याचे आमदार यांच्यात माईकवरून राडा झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार बाबुराव पाचर्णे सभासदांना माकड म्हटल्याने वाद वाढला, तर माजी आमदार अशोक पवार यांच्यात माईक हिसकावून घेण्यावरून वाद झाला.

शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. आमदार बाबुराव पाचर्णे हे बसलेल्या सभासदांना माकड म्हटले. त्यावरून शाब्दिक चकमक झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि तालुक्याचे आजी माजी आमदार यामध्ये मोठ्या प्रमाणावर शाब्दिक युद्ध रंगले. तर, आमदार आणि चेअरमन यांच्यात माइक ओढा ओढेचे नाट्य देखील पाहायला मिळाले.

तर विरोधकांनी चेअरमन चोर आहे, अशा घोषणाबाजी केली. आमदारांनी भर सभेत एकाला माकड म्हटल्यावर वातावरण तापले होते. निवडणुकीच्या आधीच सध्याचे आमदार बाबुराव पाचर्णे व माजी आमदार अशोक पवार यांच्यातील माईक फाईट चर्चेचा विषय ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clash between Baburao Pacharne and Ashok Pawar in Shirur