Indapur Crime : निमगाव केतकी येथे दोन गटात मारामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील दोन गटांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून झालेल्या मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Beating
Beatingsakal
Updated on

इंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील दोन गटांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून झालेल्या मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये शंकर भीमराव भोंग (वय-37 वर्षे, व्यवसाय शेती, रा. निमगाव केतकी, ता. इंदापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (ता.14) रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास निमगाव केतकी गावचे हद्दीत इंदापुर रोडवर इसम नामे जय कुदळे, दिनेश शेंडे, दादा भोंग, सुरज पिसे, ओमकार राउत, यांनी आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ वादातुन फिर्यादीची बुलेट मोटारसायकल (क्रमांक MH-42BH9090) त्यांचेकडील चार चाकी कारने अडवली.

त्यानंतर आरोपींनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी जय कुदळे याने त्याचे हातातील धारदार चाकुने फिर्यादीचे उजवे हाताचे अंगठ्याजवळील बोटावर वार करून बोट नखाजवळुन कट होवुन फॅक्चर झाले. त्याचवेळी दिनेश शेंडे याने फिर्यादीच्या गळ्यातील 5 तोळ्याची सोन्याची चैन काढुन घेतली. व 'पुन्हा आमचे नादाला लागला तर तुला मारूनच टाकतो' अशी धमकी देवुन फरार झाले. यावरून जय कुदळे, दिनेश शेंडे, दादा भोंग, सुरज पिसे व ओमकार राउत (सर्व रा.निमगाव केतकी) यांचे विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दादासो मधुकर भोंग (वय-27 वर्षे, व्यवसाय शेती, रा. निमगाव केतकी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (ता. 14) रोजी सकाळी 10.30 वाजताचे सुमारास निमगाव केतकी गावचे हददीत डोंगरे कॉम्प्लेक्स समोर गावातीलच इसम नामे शंकर भोंग, स्वप्नील भोंग, शक्ती बारवकर, स्वप्नील बारवकर, अमोल भोंग, आशितोष भोंग यांनी रात्रीचे भांडणाचे कारणावरून फिर्यादीसह त्याचे मित्र जय कुदळे व दिनेश शेंडे यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच शंकर भोंग याने त्याचेकडील चाकुने फिर्यादीच्या डाव्या हाताचे अंगठ्याजवळील बोटावर मारहाण करून दुखापत करीत डाव्या हाताच्या बोटातील 1 तोळ्याची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन घेतली. तसेच दिनेश शेंडे याचे पृष्ठभागावरील उजव्या बाजुला चाकु मारून किरकोळ दुखापत केली.

यावरून शंकर भोंग, स्वप्नील भोंग, शक्ती बारवकर, स्वप्नील बारवकर, अमोल भोंग, आशुतोष भोंग (सर्व रा. निमगाव केतकी) यांच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या दोन्ही घटनांचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश माने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com