

पुणे, ता. ५ : जिल्हा परिषद शाळांचा वीज खर्च कमी करण्याबरोबरच स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. बँकेच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील ४२ जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात १२८ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभे केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी बँकेने जिल्हा परिषदेला ७५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या ‘क्लीन पॉवर फॉर एव्हरी झेडपी स्कूल’ या उपक्रमांतर्गत हे काम करण्यात येणार आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रामा मोहन राव अमरा यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये ऑन-ग्रिड सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांच्या वीज खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सौरऊर्जा, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रकल्पानंतर भविष्यात अधिकाधिक शाळांमध्ये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही स्टेट बँकेने दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, स्टेट बँकेच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक नंदकिशोर सिंह यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.