
Pune News : पुणे महापालिका (Pune Corporation) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Pune University) संयुक्त उपक्रम असलेल्या ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धे’त अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे, असे विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. (Pune Corporation University Competition News)
स्पर्धेसाठी यापूर्वी २४ डिसेंबरपर्यत मुदत देण्यात आली होती, मात्र अधिकाधिक नागरिकांना यामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी अर्ज करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली.
हे स्टार्टअप चॅलेंज समाज सहभाग (सोशल इन्कलूजन), शून्य कचरा व्यवस्थापन (झिरो डंप), प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन (प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट) आणि पारदर्शकता (ट्रान्स्फरन्सी) या चार मुख्य संकल्पनांवर आधारित असून ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
इच्छुकांनी आपली नवकल्पना पाच ते सहा स्लाईडमध्ये आणि पाच मिनिटांच्या व्हिडीओमधून मांडणे आवश्यक आहे. अधिक माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे डॉ. पालकर यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी https://forms.gle/8umeAZXdRsCBzRvz5 या लिंकवर अर्ज करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.