स्वच्छ सुंदर परिसरातूनच सुंदर सुसंस्कृत नागरीक घडतात प्रदीप खांडेकर
BHM26B02167
हुन्नूर (ता. मंगळवेढा) ः येथील श्री बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियानांतर्गत मंदिर परिसर स्वच्छ करताना प्रदीप खांडेकर, हभप होनमोरे महाराज, प. स. सदस्य अप्पासाहेब निकम व ग्रामस्थ.
मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावांमध्ये ‘गाव स्वच्छता मोहीम’ अभियान
स्वच्छ परिसरातून सुसंस्कृत नागरिक घडतात ः खांडेकर, हन्नूर येथे परिसराची स्वच्छता
भोसे, ता. ६ ः स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, गरिबांना मदत करा आणि परिसर स्वच्छ ठेवा हा संदेश आयुष्यभर देणाऱ्या राष्ट्रसंत गाडगेबाबांना यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हभप परशुराम होनमोरे महाराज यांनी मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावांची ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यातील ८१ गावांमध्ये ‘गाव स्वच्छता मोहीम’ कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वच्छता मोहिमेचे सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. स्वच्छ सुंदर परिसरातूनच सुंदर सुसंस्कृत नागरी घडतात, असे प्रतिपादन भोसे जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य प्रदीप खांडेकर यांनी हुन्नूर येथे केले.
हभप होनमोरे महाराज त्यांचे सहकारी व हुन्नूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हुन्नूर येथील श्री बिरोबा मंदिर परिसरामध्ये ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. अप्पासाहेब निकम, मच्छिंद्र खताळ, सिद्धेश्वर मेटकरी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग हंबर्डे, शहाजी सूर्यवंशी, रावसाहेब कोरे, ज्ञानदेव घाडगे, पवन होनमोरे, पिंटू पुजारी, सागर खताळ, देवराज पुजारी, शिवानंद चौगुले, अप्पासाहेब जगदाळे, संपत साळुंखे, लक्ष्मी होनमोरे, मंगल ननवरे, शीतल सरगर आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
स्वच्छता ही प्रत्येक माणसाची सामूहिक जबाबदारी असते. परिसर स्वच्छ ठेवला तर रोगराई होणार नाही, असे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांनी यावेळी सांगितले. हभप होनमोरे महाराज यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला असून, आतापर्यंत समाजप्रबोधन व आपल्या प्रवचनातून व्यसनमुक्ती, मुली वाचवा अभियान असे सामाजिक संदेश दिला आहे.
स्वच्छतेची जनजागृती म्हणून मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावांमध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत गाव स्वच्छता मोहीम हा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक गावातील अधिकारी व पदाधिकारी व सर्व ग्रामस्थांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ व सुंदर करावा, असे मत पंचायत समिती सदस्य डॉ. अप्पासाहेब निकम यांनी यावेळी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

