Pune News : नाले सफाई की तिजोरीची सफाई?; निविदा ५२ टक्क्यापर्यंत कमी दराने

पुणे शहरातील नाले सफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेच्या निविदा ९ टक्क्यांपासून ते ५२ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत.
drainage cleaning

drainage cleaning

esakal
Updated on

पुणे - शहरातील नाले सफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेच्या निविदा ९ टक्क्यांपासून ते ५२ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत. महापालिकेच्या पूर्वगणनपत्रकापेक्षा ५० टक्के कमी खर्चात ठेकेदार काम करण्यासाठी तयार होत आहे. त्यामुळे नाले सफाईची कामे प्रत्यक्षात होणार की केवळ बिले काढून तिजोरीची सफाई होणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत कमी दराच्या निविदेवरून बराच वादंग झाल्याने आता यासंदर्भात या निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com