वादळानंतर काही तासात बारामती चकाचक

मिलिंद संगई
Monday, 20 April 2020

कसलीही आपत्ती आली तरी बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छतादूतांचे हात बारामतीकरांच्या मदतीला धावून येतात हे वेळोवेळी दिसलेले आहे. कालच्या वादळानंतर काही तासात बारामती चकाचक करण्याचे काम या स्वच्छतादूतांच्या हातांनी केल्यानंतर बारामतीकरांनी त्यांना मानाचा मुजरा केला.

बारामती - कसलीही आपत्ती आली तरी बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छतादूतांचे हात बारामतीकरांच्या मदतीला धावून येतात हे वेळोवेळी दिसलेले आहे. कालच्या वादळानंतर काही तासात बारामती चकाचक करण्याचे काम या स्वच्छतादूतांच्या हातांनी केल्यानंतर बारामतीकरांनी त्यांना मानाचा मुजरा केला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रचंड वेगाने आलेल्या वादळाने काल रात्री (ता. 19) बारामतीला तडाखा दिला. या वादळाने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. मात्र बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर, आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, सुभाष नारखेडे, अजय लालबिगे, संजय गडीयाल, चंदन लालबिगे, दादा घोलप, बळवंत झुंज, राजू वाल्मिकी, विलास देवकाते  यांच्यासह आरोग्य विभागातील असंख्य स्वच्छतादूतांनी पहाटे दोन वाजेपर्यंत जागून शहरातील रस्त्यावरील झाडे दूर करण्यासोबत तातडीने स्वच्छता करुन कचरा गोळा केला. 

वादळ इतक्या वेगाने होते की शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर झाडांची मोठी पानगळ झालेली होती, अनेक झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या तर काही झाडेच रस्त्यावर पडलेली होती. मात्र आरोग्य विभागाने तातडीने हालचाल करुन सर्व कचरा वेगाने गोळा करत शहर चकाचक केले. दैनंदिन स्वच्छतेव्यतिरिक्त आज सर्वांवरच कमालीचा ताण आलेला असतानाही कसलीही उसंत न घेता या स्वच्छतादूतांनी बारामती पूर्ववत करण्यात योगदान दिले. 

स्वच्छता करणारी यंत्रे पडून...
अदर पूनावाला यांनी बारामती नगरपालिकेला स्वच्छतेसाठी दोन यंत्रे उपलब्ध करुन दिली होती. नगरपालिकेने काही दिवस या यंत्राचा वापर केला आणि आज ती अक्षरशः धूळ खात पडून आहे. या यंत्राचा वापर सुरु केल्यास त्याचा शहर स्वच्छतेसाठी उपयोग होऊ शकेल, अशी नागरिकांची भावना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning within hours after the storm in baramati

Tags
टॉपिकस
Topic Tags: