वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राजगड व भोर तालुका महसूल विभाग वतीने किल्ले राजगडावर स्वच्छता मोहीम शुक्रवार (ता.१४) रोजी राबविण्यात आली असल्याची माहिती भोरचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात यांनी दिली..हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यामध्ये विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. यामध्ये राजगड तालुका महसूल विभाग व भोर तालुका महसूल विभागाच्या वतीने किल्ले राजगडावर स्वच्छता मोहीम राबवत अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरवले. महसूल विभागाच्या या उपक्रमाला साथ देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, व राजगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य सकाळी साडेसात वाजता राजगडावरील पद्मावती मंदिराजवळ एकत्र येत स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. .यावेळी भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, राजगड तालुका प्रांताधिकारी महेश हरिश्चंद्रे,तहसीलदार निवास ढाणे,नायब तहसिलदार मयुर बनसोडे,निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बडे,भोरचे निवासी नायब तहसीलदार अरुण कदम,महसूल नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे,निवडणूक नायब तहसीलदार आदेश धुनाखे, अव्वल कारकून मंदार नेरेकर ,मंडल अधिकारी रतन कांबळे, राजपाल यादव,कैलास बाठे ,तलाठी रवीकरण पाटील,हेमंत घोडके,वेल्हे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज कुंभार, रोहित नलावडे यांसह आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले,पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे, विशाल कचरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते..स्वच्छता मोहिमेमध्ये पद्मावती देवी मंदिर,महादेव मंदिर परिसर शेजारी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे टाके,पद्मावती तलाव,अंबरखाना परिसर,राजसदर,बालेकिल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत पंधरा ते वीस पोती प्लास्टिक बाटल्या,कागदे, खाद्यपदार्थांच्या पिशव्या अश्या कचरा जमा करण्यात आला. त्यानंतर त्या कचऱ्याची विल्हेवाटही लावण्यात आली..किल्ल्यावर स्वच्छतागृहांची दुरावस्था तसेच किल्ल्यावर घडलेल्या अपघातांची परिस्थिती पाहता सुट्टीच्या दिवशी गडावर व गडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथक नेमणे गरजेचे असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार.डॉ. विकास खरात ,उपविभागीय अधिकारी भोर.गडकोटावर आल्यानंतर तेथील स्वच्छता राखणे व सुस्थितीत ठेवणे ही प्रत्येक पर्यटक व शिवप्रेमींची जबाबदारी आहे याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.निवास ढाणे, तहसीलदार (राजगड,वेल्हे).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.