
पुणे - शहर स्वच्छता अभियानापासून चार हात लांब राहिलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर अभियानाच्या अंतिम टप्प्याची जबाबदारी सोपविली आहे. सुमारे आठ लाख पुणेकरांपर्यंत पोचून त्यांनी ‘ॲप’ डाउनलोड केले का ? त्यावरचे प्रश्न, उपप्रश्न सोडविले का? अशी विचारणाच नव्हे; तर कार्यवाहीचे फर्मानही प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सोडले आहे. महत्त्वाचे म्हणजे, झालेली कामे तपासून कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामावर नजरही ठेवली जात आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत होणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्यापर्यंत पोचण्याच्या उद्देशाने महापालिका जोरदार प्रयत्न करीत आहे. यात नागरिकांना सामावून घेण्याचे आव्हान असतानाच महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी मात्र, या प्रक्रियेपासून लांब राहात असल्याचे दिसून आले. त्यामुळे अंमलबजावणी काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते. तेव्हा शेवटच्या टप्प्यात चमकदार कामगिरी करून अभियानात बाजी मारण्याच्या हेतूने मुख्य विभागांसह क्षेत्रीय कार्यालयांमधील सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना (लिपिक) प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार ११ कर्मचाऱ्यांचा एक गट तयार केला आहे. अशा गटांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद
साधण्याची मोहीम महापालिकेने उघडली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याविषयी महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, ‘‘घरोघरी जाण्यासह बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये आणि अन्य वर्दळीच्या ठिकाणी जाऊन लोकांना स्वच्छ सर्वेक्षणाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्याची विनंती केली जाणार आहे. त्यानंतर त्यातील मुख्य १२ आणि ७ उपप्रश्नांची उत्तरे दिली आहेत का, हे तपासण्यात येणार आहे. त्याशिवाय जे नागरिक सहभागी होत नाहीत, त्यांचा समावेश करण्याच्या दृष्टीने कर्मचारी प्रयत्न करणार आहेत. मात्र, उद्या (ता.८) राष्ट्रीय संप असल्याने कर्मचाऱ्यांना मूळ कामाची जबाबदारी असेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.