esakal | शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील हक्काची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा I Provident Fund
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers do not live in the place of appointment

शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील हक्काची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती - गेले वर्षभर बंद असलेली बी.डी. एस. प्रणाली सुरु झाल्याने शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.

शिक्षकांना आजारपण,मुलांचे शिक्षण,लग्न,घरबांधणी,घरदुरुस्ती याकरीता भविष्य निर्वाह निधीतून विना परतावा व परतावा कर्ज दिले जाते. सदर कर्ज मागणीस जिल्हा परिषदेची मंजुरी मिळाल्यानंतर मंजूर कर्ज रक्कम राज्य शासनाकडून बी. डी. एस. प्रणाली द्वारे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागास दिली जाते.त्यानंतर सदर रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

हेही वाचा: आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्याने पीक कर्ज

गेले वर्षभर बी. डी. एस.प्रणाली बंद असल्याने अनेक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतून कर्ज मंजूर होऊनही राज्य शासनाकडून रक्कम न मिळाल्याने शिक्षकाना भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही.त्यामुळे शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.बी. डी. एस.प्रणाली सुरु व्हावी याकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस केशवराव जाधव यांनी सात्यत्याने पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते.तसेच अर्थ खात्याचे सचिव यांचेकडे सात्यत्याने पाठपुरावा सुरु होता..

नुकतीच शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस केशवराव जाधव, राजू बालगुडे यांनी भेट घेत बी. डी.एस.प्रणाली लवकर सुरु व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर बी. डी. एस.प्रणाली सुरु झाली.

loading image
go to top