पुणे - वाढत्या शहरीकरणात सुरू असलेली विकास कामे, सिमेंटचा वाढता विळखा, अन् काही ठिकाणी अद्यापही दाटलेली हिरवाई, याचाच परिणाम शहरातील हवामानात होत असल्याचे निदर्शनास येत आहे..म्हणूनच गेल्या काही दिवसांत शहराच्या काही भागात ९ ते १० अंश सेल्सिअस किमान तापमान, तर काही भागात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्याही पुढे असल्याचे दिसून येत आहे. शहरात अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात तब्बल सहा अंशांपर्यंतची तफावत असल्याची माहिती समोर आली आहे..शहरीकरण आणि भौगोलिक रचनेमुळे हवामानातील ही तीव्र विसंगती अधिक ठळक होत असल्याचे चित्र आहे. शहरात काही ठिकाणी कडाक्याची थंडी, तर काही भागात तुलनेने उबदार वातावरण असल्याचे पहायला मिळते. पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसात शहराच्या विविध भागांतील तापमानात मोठा फरक दिसून येतो..भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमध्ये किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस आणि हवेली १०.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर याचदिवशी अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या मगरपट्ट्यात तापमान तब्बल १६.९ अंश सेल्सिअस, लोहगाव १६.२ आणि कोरेगाव पार्क १४.९ अंश सेल्सिअस होते. इतक्या कमी अंतरात तापमानात एवढा मोठा फरक आढळून आला आहे. त्यामुळे एकाच शहरात कुठे कडाक्याची थंडी, तर कुठे उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे..आजचा हवामानाचा अंदाजपुणे आणि परिसरामध्ये मंगळवारी (ता. १३) कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअसची घट होणार असून, किमान तापमान स्थिर राहणार आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे..मात्र गुरुवारपासून (ता. १५) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाची वेधशाळा शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय येथे आहे. या परिसरात मोकळी जागा आणि हिरवाई जास्त असून, बांधकाम कमी असल्याने येथे किमान तापमानात घट दिसते. शिवाय, मोकळ्या जमिनीतून रात्री उष्णता वेगाने आकाशात उत्सर्जित होत असल्याने पहाटे या भागांत कडाक्याची थंडी जाणवते..याउलट, मगरपट्टा, लोहगाव, कोरेगाव पार्क हे परिसर आयटी हब आणि दाट लोकवस्तीचे असून, सिमेंटच्या इमारती, डांबरी रस्ते आणि काचांच्या इमारतींचे प्रमाण मोठे आहे. हे घटक दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती हळूहळू बाहेर सोडतात. परिणामी, रात्री आणि पहाटे या भागात तापमान तुलनेने अधिक राहते. उंच इमारतींमुळे वाऱ्याचा प्रवाह अडवला जातो, त्यामुळे गरम हवा तिथेच साठून राहते.- डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक ‘डी’, भारतीय हवामानशास्त्र विभाग.सकाळी थंडी, दुपारी ऊनगेल्या काही दिवसांत शहरातील किमान तापमानात लक्षणीयरित्या घट झाली होती. त्यामुळे थंडी वाढली होती. मात्र सोमवारी (ता. १२) कमाल तापमानामध्ये मोठी वाढ होत असून, किमान तापमानात किंचित वाढ झाली. त्यामुळे शहरात संमिश्र वातावरण होते. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन तर सायंकाळी दमट हवामान होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.