पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी 'तो' चढला पुलावर आणि... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपल्या मागणीसाठी पुलावर चढून बसलेल्या युवकाची अखेर पोलिसांनी समजूत काढली

पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी 'तो' चढला पुलावर आणि...

पुणे : शिवाजीनगरच्या पाटील इस्टेट झोपडपट्टी जवळ असलेल्या पुलावर चढून बसलेल्या एका तरूणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपली मागणी मान्य झाली नाहीतर पुलावरून उडी मारेल असे तो धमकावत होता. तो आत्महत्या करतो की काय अशी भिती सर्वांना वाटत होती अनेक जण त्याची लांबूनच समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तो दाद द्यायला तयार नव्हता.

आपल्या मागणीसाठी पुलावर चढून बसलेल्या युवकाची अखेर पोलिसांनी समजूत काढली

आपल्या मागणीसाठी पुलावर चढून बसलेल्या युवकाची अखेर पोलिसांनी समजूत काढली

खडकी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, त्याची चौकशी केली असता असे समजले की बारामती भागातून आलेल्या या युवकाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना भेटायचं होते. त्यांना देण्यासाठी त्याने एक बंद लिफाफा आणला होता. पोलिसांनी त्याची समजूत काढली. पोलीस अधिका-यांना भेटण्यासाठी अशी कृती करायची गरज नाही हे त्याला पटवून दिले. आता तो युवक पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षकांची भेट घ्यायला गेला आहे. त्याची तक्रार काय होती ती मात्र समजू शकले नाही.

loading image
go to top