

CM Devendra Fadnavis Baramati Irrigation Project
ESakal
बारामती : तालुक्यातील जिरायत भागासाठी महत्वाची असलेल्या नीरा क-हा नदी जोड व उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. हा प्रकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते.
बारामती तालुक्यावरील जिरायत हा शिक्का पुसून टाकण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. या साठी नीरा व क-हा नदीच्या पाण्याची महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना आखून हा प्रश्न कायमस्वरुपी संपविण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता. अजित पवार यांच्या दुर्देवी निधनानंतर या प्रकल्पाच्या भवितव्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती, आजच्या निर्णयाने हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार हे निश्चित झाले आहे.