Devendra Fadnavis vs Ajit Pawar
sakal
पुणे - ‘पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार,’ असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळाचा नारा दिला. ‘भाजपने मागील पाच वर्षांत पुण्यात चांगले काम केले आहे. त्यामुळे दोन्ही मोठे पक्ष वेगळे लढतील, फक्त ही लढत मैत्रीपूर्ण असेल,’ असे फडणवीस यांनी सांगितले.