

CM Devendra Fadnavis
ESakal
पुणे - ‘सरकार सर्वांचे म्हणणे ऐकून घेते. जनहिताच्या आणि संविधानाच्या चौकटीतील मागण्यांचा विचार केला जाईल; मात्र संविधानात न बसणाऱ्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत. नियमबाह्य पद्धतीनेही निर्णय घेतले जात नाहीत. सरकार संविधानाप्रमाणे चालते. सरकार कोणाच्याही दबावाने चालत नाही,’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मनोज जरांगे यांचे नाव न घेता टोला लगावला. तसेच ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’च्या (जीसीसी) क्षेत्रात पुणे देशाची राजधानी ठरणार असून, जीसीसी क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.