
CM Devendra Fadnavis
sakal
पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर संघटनेची तयारी काय आहे? याची झाडाझडती घेण्यासाठी उद्या (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काय तयारी केली आहे याचे उत्तर पदाधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे.