Pune News : पुण्यातील अतिक्रमण कारवाईचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; नागपूरमध्येही बेकायदा होर्डिंगविरोधात कारवाईचे निर्देश

पुणे शहरात अतिक्रमणांचा भस्मासुर झाला असून, पादचारी मार्ग, फ्रंट आणि साईड मार्जिनमध्ये दुकाने, हॉटेल, गॅरेज यासह अन्य व्यवसाय थाटले आहेत.
Chief Minister praises anti-encroachment drive in Pune

Chief Minister praises anti-encroachment drive in Pune

sakal

Updated on: 

पुणे - पुणे शहरात गेल्या १० दिवसांपासून सलग अतिक्रमण कारवाई सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १० लाख चौरस फुटांवरील अतिक्रमण काढले असले तरी अजूनही खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शिल्लक असल्याने तेथे कारवाई करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचे समाज माध्यमावरून कौतुक केले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे मनोधैर्य आणखी वाढल्याने कारवाईचा वेग वाढविण्याचे संकेत आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...