
पुणे : ‘‘कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून, महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. पुणे शहर प्रचंड प्रगतिशील आणि नावीन्यतेचे केंद्र असून, नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. त्यासाठी ‘ग्रोथ हब’च्या माध्यमातून तयार होणारा विकास आराखडा महत्त्वपूर्ण ठरेल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.