CM Devendra Fadnavis
sakal
पुणे - पुण्यात केवळ ९ टक्के रस्ते असून, त्यावर क्षमतेच्या दुपटीपेक्षा जास्त भार असल्याने वाहने कासवगतीने पुढे सरकतात. मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण, इ बसची खरेदी, ‘एआय’च्या मदतीने प्रमुख ३२ रस्त्यांची सुधारणा करण्याची योजना तयार केली आहे. पण पुण्यात बहुतांश प्रमुख रस्त्यांची रचना ही पूर्व- पश्चिम आहे, दक्षिण उत्तर रस्ते हे छोटे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.