
पुणे : पुणे व खडकी कॅंटोन्मेंटच्या हद्दीतील नागरी परिसर महापालिकेत विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.१०) मुंबईत बैठक होणार आहे. पुणे, खडकी कॅंटोन्मेंटसह राज्यातील अन्य कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसर संबंधित कॅंटोन्मेंटजवळील स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीनीकरण करण्यासंदर्भात चार वर्षांपासून चर्चा सुरू आहे.